Friday, September 19

टॉप टेन : मराठी मातीतून निर्माण झालेली ’खेल रत्ने’

देशाच्या सर्वांगीण प्रगतीत महाराष्ट्राने फार मोठा हातभार लावला आहे. इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडाक्षेत्रालाही महाराष्ट्राने देशाचे नाव गाजवणारे अनेक नायक दिले. क्रीडाक्षेत्रातील हे कांही निवडक मरठी मानबिंदू:
क्रिकेटमहर्षि दि.ब.देवधर : क्रिकेट आज देशातला सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. अनेक मरठी क्रिकेट सुपरस्टार्स महाराष्ट्रातून निर्माण झाले. पण देवधरांना आद्य क्रिकेट सुपरस्टार म्हटल्यास वावगे ठरू नये. पंचरंगी व रणजी स्पर्धांमधून देवधरानी नेत्रदीपक कामगिरी केली. भारतचे कसोटी सामन्यात पदार्पण त्यांच्यासाठी उशीरा झाले. पण इंग्लिश क्रिकेट मध्ये डब्ल्यू.जी. ग्रेस यांच्याप्रमाणेच देवधरांचे भारतीय क्रिकेट मध्ये मानाचे स्थान आहे।

खाशाबा जाधव : नुकत्याच संपलेल्या ऑलिम्पिक्सच्या निमित्ताने खाशाबा जाधवांचे नाव नवीन पिढीला माहीत झाले. भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक मिळवण्याचे श्रेय त्यांना जाते. १९५२ च्या हेलिसिंकी ओलिम्पिक्समध्ये त्यांनी कुस्तीत ब्रॉंझपदक पटकावले होते. यंदाच्या तीन पदकविजेत्यांना भरपूर बक्षिसे व मानसन्मान मिळाले. पण खाशाबा जाधवांच्या वाटेला मात्र उपेक्षाच आली.
प्रवीण ठिपसे : भारतात व महाराष्ट्रातही बुध्दिबळ हा खेळ अत्यंत लोकप्रिय आहे. १९८० पर्यंत मॅन्युएल ऍरॉन हा भारताचा एकमेव आंतरराष्ट्रीय मास्टर होता. प्रवीण ठिपसे हा ग्रॅंडमास्टर नॉर्म मिळवणारा पहिला भारतीय. त्याच्या पावलावर पाउल ठेवत दिव्येंदु बारुआ व विश्वनाथन आनंद यांनी ग्रॅंडमास्टर किताब मिळवला. आनंद आज विश्वविजेता आहे. भारताकडे बुध्दिबळातील सुपरपॉवर म्हणून पाहिले जाते. पण याची सुरुवात प्रवीण ठिपसे पासून झाली हे मराठी माणसासाठी निश्चितच अभिमानास्पद!
बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर व टेबल टेनिस मध्ये सुजय घोरपडे यांनीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन केले. भारतात हॉकीची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रातही हॉकीचे फारसे चाहते नाहीत. तरीही महाराष्ट्राच्या तुषार खांडेकरने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून चांगली कामगिरी केली.
भारतीय शूटर्स सध्या प्रसिध्दीच्या झोतात आहेत. राज्यवर्धन राठोड, अभिनव बिन्द्रा इ. या नव्या पिढीच्या आधी नेमबाजीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून भारताचे प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्याच अशोक पंडितने अनेक वर्षे केले. इतर स्पर्धांमधून चमकणाऱ्या महाराष्ट्राच्या अंजली भागवत, दीपाली देशपांडे, सीमा शिरुर या महिला नेमबाज ऑलिम्पिक्समध्ये मात्र सातत्याने अयशस्वी होत आहेत.
भारतीय क्रिकेटला अनेक मराठी रत्ने लाभली. मुंबईस तर क्रिकेटचे माहेरघर म्हटले जाते. या मोठ्या यादीतील दोन नावांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पुरा होऊच शकत नाही. सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर. दोघेही आपापल्या कालखंडातील जगात सर्वोत्कृष्ट मानल्या गेले आहेतच. स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवाच्या जवळपास गावसकरांची कारकीर्द तर सुवर्णमहोत्सवाच्या वेळेस सचिन टॉप फॉर्मात. गावसकर खंबीर तर सचिन आक्रमक. आपपल्या काळातील भारतीय समाजाचे प्रतिबिम्ब दोघांच्याही शैलीत दिसते.
तर हा मराठी ’खेल रत्नाचा’ थोडक्यात आढावा. मराठी समाजाने खेळ संस्कृतीची जोपासना करत राहिल्यास भविष्यातही अशी अनेक रत्ने या मातीतून जन्माला येतील हे नक्की!

Tuesday, September 16

क्रिकेटव्यतिरिक्त अन्य क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडू‘ची चमकदार कामगिरी

आम्हा क्रिकेटवेड्या भारतीयांच्या नजरेतून अन्य क्रीडापटू‘ची वाखाणण्याजोगी कामगिरीही अनेकदा सुटते. गेल्या आठवड्यात दोन भारतीय महिला खेळाडूंनी आ‘तरराष्ट्रीय पातळीवर उत्तम प्रदर्शन केले, पण क्रिकेटच्या गदारोळात त्याकडे दुर्लक्षच झाले।

पहिला उल्लेख साईना नेहवालचा. नुकत्याच झालेल्या बॅडमिन्टनच्या चायनीज तैपे ओपन ग्रा‘ंप्री या अत्य‘ंत प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेचे तिने अजि‘ंक्यपद पटकावले. ऑलिम्पिक्समध्येही साईनाने उपा‘ंत्यपूर्व फेरीपर्य‘त मजल मारली होती व आपल्या झु‘जार खेळाने छाप पाडली होती. या विजयामुळे जागतिक क्रमवारीत ती पहिल्या दहामध्ये येऊ शकेल. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स पर्य‘त साईनाचे नाव सुवर्णपदकाच्या शर्यतीत नक्की येईल।

भारताच्या कोनेरु हम्पी जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत निकराच्या झु‘न्जीनांतर हार पत्करली. खरे तर या स्पर्धेत हम्पी टॉप सीडेड होती पण चीनच्या चौदा वर्षीय खेळाडूने ने तिला टायब्रेकरमध्ये हरवले. इकडे पुरुषांच्या बिल्बाओ ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमाना‘कित विश्वनाथन आन‘द चक्क शेवटच्या क्रमा‘कावर फेकल्या गेला. पुढील महिन्यात त्याची क्रामनिकविरुद्ध महत्वपूर्ण लढत होणार आहे. त्याच्या ऎन तो‘डावर आन‘दला मोठा धक्का बसला आहे।

भारतीय महिला क्रिकेट स‘घाची कर्णधार मिताली राज हिची इ‘ग्ल‘डविरुद्ध एकाकी झु‘ज हेही तसे दुर्लक्षितच राहिले. अन्य क्रीडापटूंपैकी प‘कज अडवाणीने जागतिक बिलियर्डस स्पर्धेत व सौरव घोशाल याने फ्रान्स मधील स्क्वॅश स्पर्धेत अलीकडेच उल्लेखनीय यश मिळवले. एका सौरवचा (गांगुली) अस्त होत असताना कलकत्त्यातच दुसऱ्या सौरवचा (घोशाल) उदय होणे हा योगायोगच म्हणावा लागेल।

एक‘दरीत भारतीय क्रीडाक्षेत्रात अनेक प्रतिभावान खेळाडू चमक दाखवित आहेत. त्यांना क्रीडा रसिका‘ंच्या भरघोस पाठि‘ंब्याची गरज आहे.

Friday, September 12

महेन्द्रसिँग धोनी - वन डे क्रिकेटर ऑफ़ दि ईयर

ऑगस्ट २००८ मध्ये स‘पलेल्या आयसीसी च्या वर्षात महेन्द्रसिँग धोनीला अभूतपूर्व यश मिळाले. भारतीय वन डे व टी-२० संघाच्या या वर्षभरातील चमकदार कामगिरीत कर्णधार व फलंदाज म्हणून त्याची भूमिका निर्णायक होती. भारत सरकारने नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. आणि काल जाहीर झालेला क्रिकेटचे ऑस्कर आयसीसी ऍवार्डस पैकी वन डे क्रिकेटर ऑफ़ दि ईयर चा पुरस्कार म्हणजे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
काल जाहीर झालेल्या आयसीसी ऍवार्डस विजेत्यांमध्ये एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू नाही हे आश्चर्यच! शिवनारायण चंद्रपौलने यंदा कसोटी आणि वन डे मध्ये धावांचा पाउस पाडला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड अपेक्षितच होती. वेस्ट इंडीजसारख्या सतत हरणाऱ्या स‘घासाठी काढलेल्या त्याच्या धावांचे मोल निश्चितच मोठे आहे.
डेल स्टेनची उत्क्रूष्ट कसोटीपटू व अजेंता मे‘डीसची उत्क्रूष्ट उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारा‘साठी निवडही अपेक्षितच होती. युवराजला टी-२० प्रकारातील पुरस्कार मिळाला. कसोटी संघातली जागा गमावल्यान‘तर व स्वच्छंद वागणुकीमुळे टीका झेलत असलेल्या युवराजला तेवढाच दिलासा!
या पुरस्कारामुळे महेन्द्रसिँग धोनीची लोकप्रियता अजूनच वाढतीय. कसोटी संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे सोपवावे की नाही याबद्दल चर्चा रंगत आहेत. [वाचा...] तुम्हाला काय वाटते?